टिटवी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

टिटवी

टिटवी किंवा लाल गाठीची टिटवी, ताम्रमुखी टिटवी, राम टेहकरी किंवा हटाटी (इंग्लिश:Redwattled Lapwing; हिंदी:टीटाई, टिटी) हा एक पक्षी आहे. याला संस्कृतमध्ये टिट्टिभ, टिट्टिभक किंवा कोयष्टिक म्हणतात. इंग्लिशमध्ये यास लॅपविंग असा शब्द आहे. पायांच्या विशिष्ट रचनेमुळे टिटवीला झाडावर बसता येत नाही. ती जमिनीवरच तुरुतुरू चालते. जमीन उकरून त्यात अंडी घालते. टिट्‌-टिट्‌-ट्यूटिट्‌ असा आवाज काढून उडताना संकटाचा थोडा जरी संशय आला, तरी ती इतरांना सावध करते.

टिटवा-टिटवी हे शब्द ज्ञानेश्वरीत दोनदा आले आहेत. संत एकनाथ यांनी टिटवी नावाचे भारूड लिहिले आहे.

कुररी नावाचा एक वेगळा पक्षी आहे. संस्कृतमध्ये तिला उत्क्रोश म्हणतात आणि इंग्रजीत ’इंडियन व्हिस्कर्ड टर्न. टिटवीप्रमाणेच हाही पक्षी नदीकाठच्या वाळूत अंडी घालतो. मराठी वाङ्‌मयात कुररीला टिटवा असे म्हणले आहे. कुररीचा उल्लेख महाभारतातील शांतिपर्वात, पंचतंत्र, रघुवंश, कथासरित्सागर, भागवताचा अकरावा स्कंध आदी ठिकाणी आला आहे.

टिटवी हा पक्षी भारतवर्षात जवळपास सर्वत्र आढळतो. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे हा जीव पक्षी असूनही झाडावर बसत नाही. इतकेच काय स्वतःचे घरटे झाडावर बांधत नाही. प्राचीन धर्मग्रंथात असे भाकीत आहे की, टिटवी जेव्हा झाडावर बसेल तेव्हा जगाचा विनाश होईल. म्हणजे हा पक्षी झाडावर बसतच नाही. महाराष्ट्र पठारी प्रदेशात यांची घरटी मुरमाड जमीन किंवा मोरंडीमातीच्या जमीनीवर उघड्यावर असतात. त्यांची घरटे बांधण्यासाठी ते चिंध्या, गवताच्या काड्या विशेष म्हणजे काळ्या करड्या रंगाच्या गुळगुळीत गारगोट्यांचा आणि दगडांचा उपयोग करतात. यांचे वास्तव्य मनुष्य विरहीत पाणवठ्यांच्या काठावरही असते. जेव्हा पिलं काळी, कबरी आणि भुऱ्या रंगाच्या केसांची होतात. काही आवधीने पाणी पिण्यास लायक झाल्यावर टिटवी त्यांनी घरट्याच्या बाहेर काढते. किडे,किटक आणि भक्ष्य शोधण्यासाठी लागणारे शिक्षण देते. विषेश म्हणजे टिटवी पिलांपासून विशिष्ट अंतर ठेवून दूरवर असते. ती सतत पिलांवर जागता पहारा देत असते. एखाद्या वेळी कुत्रा किंवा इतर प्राणी त्यांच्या कक्षेत आला तर टिटवी त्यांच्यावर झडप घालते. तेव्हा तिच्या ओरडण्याची तऱ्हा विचित्र असते. शास्त्रात म्हटल्याप्रमाणे टिटवीला इतरांच्याही मृत्यूची चाहूल लवकर लागते. म्हणून तिच्या ओरडण्याची भीती वाटते. परंतु इतरवेळी तिचे ओरडणे तितके भयावह नसते. भारद्वाजाने माणसांच्या भोवती घिरट्या मारणे जसे शुभ शकुन माणले जाते. अगदी तसेच टिटवीने माणसाभोवती घिरट्या मारणे हे तितकेच अपशकून माणले जाते. त्यामुळे की काय हा पक्षी जनमानसात सतत घृणास्पद ठरल्या गेला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →