टाटा नॅनो

थोडक्यात पण महत्त्वाचे.

टाटा नॅनो

टाटा नॅनो (इंग्लिश भाषा: Tata Nano) ही टाटा मोटर्स कंपनीने बनवलेली नवीन चारचाकी (कार) आहे. टाटा नॅनो ही जगातील सर्वात स्वस्त प्रवासी कार आहे. ह्या कारची किंमत साधारण १ लाख रुपये ($ २०००) आहे. २३ मार्च २००९ रोजी टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा ह्यांनी मुंबईमध्ये ह्या कारला सादर केले. भारतातील तसेच जगभरातील बातमीदारांनी टाटा नॅनोचे २१ व्या शतकातील क्रांतिकारी कार असे स्वागत केले होते.



इंजिन - ६२४ सीसी, ३३ बीएचपी

मायलेज - जवळपास ३० किमी/लिटर

सुरक्षा- आंतराष्ट्रीय स्पेसिफिकेशनप्रमाणे

उत्सर्जन - यूरो ४च्या स्टॅंडर्डनुसार

गिअरबॉक्स - ४ स्पीड मॅन्युएल

टाकीची क्षमता - ३० लिटर

इतर- फ्रंट डिस्क ब्रेक्स व मागे ड्रम ब्रेक्स्

सर्वोच्च वेग - ९० किमी/तास

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →