झीरोशेल ही लिनक्सची एक लहान मुक्त-स्रोत आवृत्ती आहे. सर्व्हर्स आणि एम्बेडेड सिस्टीम्ससाठी तयार केलेल्या या आवृत्तीचा मुख्य उद्देश विविध नेटवर्क सेवा प्रदान करण्याचा आहे. फुलव्हिओ रिकिआर्दी यांनी विकसित केलेल्या या ऑपरेटिंग सिस्टीमचे व्यवस्थापन पूर्णपणे आंतरजाल-न्याहाळकाद्वारे केले जाते. त्यामुळे यांत बदल करण्यासाठी कोणत्याही कमांड लाइन किंवा शेलची आवश्यकता नसते. झीरोशेल प्रामुख्याने कॉम्पॅक्ट डिस्क, कॉम्पॅक्टफ्लॅश प्रतिमा आणि व्हर्च्युअल मशीनच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जात असे. यामुळे ते कोणत्याही संगणकावर तसेच रास्पबेरी पाय सारख्या एकल-बोर्ड संगणकांवर सहजपणे स्थापित करता येऊ शकते.
लिनक्सच्या या आवृत्तीमध्ये अनेक प्रगत नेटवर्क वैशिष्ट्ये अंतर्भूत आहेत. यांत नेटवर्क फायरवॉल, व्हीपीएन होस्ट-टू-लॅन आणि लॅन-टू-लॅन जोडण्या, डीएनएस आणि डीएचसीपी सर्व्हर्स, आणि बँडविड्थ नियंत्रणासाठी नेटवर्क शेड्यूलरचा समावेश होतो. याव्यतिरिक्त, यात सुरक्षा प्रमाणीकरण सेवा देखील उपलब्ध आहेत. अधिकृतपणे जून २००६ मध्ये सुरू झालेला हा प्रकल्प एप्रिल २०२१ मध्ये त्याच्या ३.९.५ या अंतिम आवृत्तीसह संपुष्टात आला. या सॉफ्टवेअरमधील काही सुरक्षा त्रुटींमुळे आणि प्रकल्पाच्या समाप्तीमुळे याचे अधिकृत डोमेन सप्टेंबर २०२१ मध्ये बंद करण्यात आले.
झीरोशेल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.