झारखंड विधानसभा हे भारताच्या झारखंड राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ८१ आमदारसंख्या असलेल्या झारखंड विधानसभेचे कामकाज रांचीमधून चालते. भारतीय जनता पक्षचे दिनेश ओराव हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री रघुवर दास हे विधानसभेचे नेते आहेत.
भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे झारखंड विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ४१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान विधानसभा २०१४ सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली.
झारखंड विधानसभा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?