जीव,जगत व परब्रह्म यांचे यथार्थ ज्ञान शास्त्रांच्या अभ्यासाने व गुरूच्या साहाय्याने करून घेऊन त्यावरून ब्रह्म ऐक्य जाणणे आणि अनुभवणे याला ज्ञानयोग म्हणतात.न ही ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते म्हणजे ज्ञानासारखे पवित्र इथे काहीही नाही असे गीतेत (४.३८) सांगितले आहे. हे पवित्रतम ज्ञान तत्त्वदर्शी गुरूच्या साहाय्याने स्वतः स्वतःच अनुभवायचे असते.
ज्ञान मिळविण्यासाठी तत्त्वदर्शी गुरूकडे नम्रतेने जायला हवे.अहंकारी मनुष्याला ज्ञान प्राप्त होण्याचा संभव नाही.ज्ञानप्राप्तीसाठी साधकाला तीव्र जिज्ञासा असली पाहिजे आणि त्याने गुरूची सेवा करीत योग्य समयाची वाट पाहिली पाहिजे.ज्ञानासाठी श्रद्धेची नितांत आवश्यकता आहे.बुद्धीनिष्ठा ही एक प्रकारची श्रद्धाच आहे. ज्ञानयोगाला तत्परताही आवश्यकता असते.
ज्ञानयोग
थोडक्यात पण महत्त्वाचे.