जोनाथन प्राइस

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जोनाथन प्राइस

सर जोनाथन प्राइस (जन्मनाव:जॉन प्राइस; १ जून, १९४७) हा एक वेल्श अभिनेता आहे जो रंगमंच, चित्रपट आणि दूरदर्शनवरील त्याच्या कामगिरीसाठी ओळखला जातो. त्याला दोन टोनी पुरस्कार आणि दोन लॉरेन्स ऑलिव्हिये पुरस्कार आणि नाटकाच्या सेवांसाठी नाइटहूडसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

रॉयल ॲकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, त्यांनी १९७० च्या दशकाच्या सुरुवातीस एक रंगमंच अभिनेता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. नाटकांमधील त्याच्या कामात ऑलिव्हिये पुरस्कार सामील आहे - १९८० मध्ये रॉयल कोर्ट थिएटरच्या हॅम्लेटच्या शीर्षक भूमिकेत आणि १९९० मध्ये सांगीतिक मिस सायगॉनमध्ये द इंजिनियर म्हणून कामगिरी केल्या बद्द्दल. ब्रॉडवे रंगमंचावर त्याने टोनी अवॉर्ड्स मिळवले - कॉमेडियन्स (१९७७) आणि मिस सायगॉन (१९९१).

त्यांनी चित्रपटांमध्ये अनेक सहाय्यक भूमिका केल्या आहे जसे ब्राझील (१९८५), इव्हिटा (१९९६), टुमॉरो नेव्हर डायज (१९९७) आणि पायरेट्स ऑफ द कॅरिबियन मालिका (२००३-०७), द एज ऑफ इनोसन्स (१९९३). २०१९ मध्ये, पोप बेनेडिक्ट सोळाव्याच्या भूमिकेत अँथनी हॉपकिन्स सोबत टू पोपमध्ये पोप फ्रान्सिसच्या भूमिकेसाठी त्याने पहिले ऑस्कर पुरस्कार नामांकन मिळवले.

दूरदर्शनवरील त्याच्या कामासाठी, त्याला बार्बेरियन्स ॲट द गेट (१९९३) आणि रिटर्न टू क्रॅनफोर्ड (२०१०) मधील त्याच्या अभिनयासाठी दोन प्राइमटाइम एमी पुरस्कार नामांकन मिळाले. २०२२ मध्ये, त्याने पुरस्कार विजेत्या नेटफ्लिक्स ऐतिहासिक नाटक मालिका द क्राउनच्या शेवटच्या दोन सत्रांमध्ये प्रिन्स फिलिप म्हणून काम केले व सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →