जोगेश्वरी–विक्रोळी जोडरस्ता (Jogeshwari – Vikhroli Link Road; संक्षेप: जे.व्ही.एल.आर.) हा मुंबई शहरामधील एक प्रमुख हमरस्ता आहे. हा रस्ता जोगेश्वरी येथे पश्चिम द्रुतगती महामार्गापासून (राष्ट्रीय महामार्ग ८ सुरू होतो. जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, पवई इत्यादी उपनगरांमधून पवई तलावाच्या दक्षिणेकडून साधारणपणे पूर्वेकडे धावणारा हा रस्ता विक्रोळी येथे पूर्व द्रुतगती महामार्गापाशी (राष्ट्रीय महामार्ग ३) संपतो. मुंबईच्या पूर्व व पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक महत्त्वाचा दुवा असून आय.आय.टी. मुंबई ह्याच मार्गावर आहे.
१९९४ साली खुला करण्यात आलेल्या ह्या रस्त्याचे २०१२ साली मोठ्या प्रमाणावर रूंदीकरण व कॉंक्रीटीकरण करण्यात आले. ह्यासाठी विश्व बँकेने प्रायोजित केलेल्या मुंबई नागरी परिवहन प्रकल्पातील रुपये २२१.४५ कोटी इतका निधी वापरण्यात आला.
जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्ता
थोडक्यात पण महत्त्वाचे.