जॉन फिट्झजेराल्ड केनेडी (इंग्लिश: John Fitzgerald Kennedy ), टोपणनाव जॅक केनेडी (इंग्लिश: Jack Kennedy), (मे २९, इ.स. १९१७; ब्रुकलिन, मॅसॅच्युसेट्स, अमेरिका - नोव्हेंबर २२, इ.स. १९६३; डॅलस, टेक्सास, अमेरिका) हा अमेरिकेचे ३५वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली.
केनेडी दुसऱ्या महायुद्धात दक्षिण प्रशांत महासागर आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात मॅसेच्युसेट्सच्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
केनेडी याची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी टेक्सासातील डॅलस शहरात हत्या झाली. खुल्या लिमोझिन गाडीतून जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला होता. टेक्सास प्रांताचे गव्हर्नर जॉन कॉनली गाडीच्या सुरुवातीच्या भागात केनेडी यांच्यासोबत बसले होते. कॉनली या हल्ल्यात जखमी झाले आणि जेडी टिपीट या पोलीस अधिकाऱ्याचा थोड्या वेळाने मृत्यू झाला होता. ली हार्वे ओस्वाल्ड नावाच्या व्यक्तीवर हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला; मात्र खटल्याची सुनावणी होण्यागोदर अवघ्या दोनच दिवसांत जॅक रूबी नामक हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, वॉरन आयोग व अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एकटा ओस्वाल्डच हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासोबतच काही वादग्रस्त श्राव्य पुराव्यांवरून प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एखादे कारस्थान हत्येस कारणीभूत असल्याचीही शक्यता व्यक्त केली.
जॉन एफ. केनेडी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.