जॉन अॅडम्स (इंग्लिश: John Adams) (३० ऑक्टोबर, इ.स. १७३५ - ४ जुलै, इ.स. १८२६) हा अमेरिकन राजकारणी व राजकीय तत्त्वज्ञ होता. ४ मार्च, १७९७ ते ४ मार्च, इ.स. १८०१ या कालखंडात तो अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष होता. जॉर्ज वॉशिंग्टनाच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकिर्दीत २१ एप्रिल, इ.स. १७८९ ते ४ मार्च, इ.स. १७९७ या काळात तो नवनिर्मित देशाचा पहिला उपराष्ट्राध्यक्ष होता. न्यू इंग्लंड येथून आलेला अॅडम्स हा बॉस्टन शहरातील नामवंत वकील होता. खंडीय कॉंग्रेशीत मॅसेच्युसेट्स संस्थानाचे प्रतिनिधित्व केलेल्या अॅडम्साने इ.स. १७७६ सालचा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा लिहिण्यास थॉमस जेफरसनास साहाय्य केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जॉन अॅडम्स
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.