जेमी लिन स्पियर्स

या विषयातील रहस्ये उलगडा.

जेमी लिन स्पियर्स

जेमी लिन स्पियर्स (४ एप्रिल, १९९१ - ) ही एक अमेरिकन अभिनेत्री आणि गायिका असून ती ब्रिटनी स्पियर्सची धाकटी बहीण आहे. स्पियर्सने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ऑल दॅट या कार्यक्रमातून बालकलाकार म्हणून केली. निकेलोडियन वरील झोई १०१ या किशोरवयीन मालिकेमध्ये (२००५-२००८) झोई ब्रुक्सची भूमिका साकारल्यानंतर तिला प्रसिद्धी मिळाली; नंतर तिने झोई १०२ (२०२३) या चित्रपटात पुन्हा हीच भूमिका साकारली. ती नेटफ्लिक्स वरील स्वीट मॅग्नोलियास या रोमँटिक मालिकेमध्ये (२०२०-सध्या सुरू) नोरीन फिट्झगिबॉन्सची भूमिका साकारत आहे. तिला ग्रॅसी पुरस्कार, दोन निकेलोडियन किड्स चॉइस पुरस्कार आणि दोन यंग आर्टिस्ट अवॉर्ड्स यांसह अनेक सन्मान मिळाले आहेत.

डिसेंबर २००७ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी आपण गरोदर असल्याची घोषणा केल्यानंतर स्पियर्स प्रसारमाध्यमांच्या मोठ्या चर्चेचा आणि वादाचा विषय ठरली होती. जून २००८ मध्ये मुलाला जन्म दिल्यानंतर स्पियर्सने पाच वर्षे अभिनयातून विश्रांती घेतली होती.

२०१३ नंतर तिने संगीत कारकिर्दीला सुरुवात केली. तिने द जर्नी (२०१४) या तिच्या पहिल्या कंट्री म्युझिक संगीतसंचातील हाऊ कुड आय वाँट मोर हे पहिले गाणे प्रकाशित केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →