जेमबे हे एक ताल वाद्य आहे जे मूळचे पश्चिम आफ्रिकेचे आहे. मालीमधील बांबरा लोकांच्या मते, जेमबे चे नाव हे त्यांच्या स्थानिक भाषेतील म्हणीवरून आले आहे: "अन्के जे, अन्के बे", ज्याचा अनुवाद "सर्वजण शांततेत एकत्र येतात" असा होतो. हेच ह्या वाद्याचा उद्देश परिभाषित करतो.
जेमबेचे शरीर किंवा कवच हे हार्डवुडचे असते आणि वरती उपचार न केलेले कच्च्या कातडीपासून बनवलेले ड्रमहेड असते, जे बहुतेक वेळा शेळीच्या कातडीपासून बनवले जाते. जेमबेचा बाह्य व्यास ३०-३८ सेमी (१२-१५ इंच) असतो आणि ५८-६३ सेमी ची उंची (२३–२५ इंच) असते. जेमबेचे वजन ५ ते १३ किलो (११-२९ पाउंड) असते जे आकारमानावर आणि बनवीण्याच्या सामग्रीवर अवलंबून असते.
जेमबे
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.