जावा ही एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज (संगणकीय भाषा) आहे. जावा ही 'सन मायक्रो सिस्टिम' ह्या कंपनीने विकसित केली आणि सर्वप्रथम सन १९९५ च्या सुमारास सार्वजनिकपणे उपलब्ध केली. जावामध्ये एकदा लिहिलेला प्रोग्राम कुठल्याही मशीनवर कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टिमवर वापरता येतो. इंटरनेटशी संबंधित असल्याने जावाचा प्रसार शिक्षणक्षेत्र, करमणूक क्षेत्र व मल्टिमिडियाच्या क्षेत्रात वेगाने होत आहे. यात प्रोग्राम लिहिणे अधिक सोपे जाते. यूजरने दिलेल्या सूचनांनुसार संगणक प्रोग्राममध्ये स्वतःहून बदल घडवून आणतो.
जावा ही 'सर्व्हर सॉफ्टवेर' तसेच 'वेब-बेस्ड सॉफ्टवेर्स' ह्या क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय आहे.त्याचप्रमाणे हाताळण्याइतक्या लहान कॉंप्युटर ('Handheld computing devices') व इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये (उदा. मोबाईल फोन, पी.डी.ए इत्यादी) जावाचा वापर केला जातो.
जावाचे मुख्य उद्दिष्ट्य तिच्या 'एकदा लिहा, सर्वत्र वापरा' अर्थात 'Write once, run everywhere' ह्या ब्रीदवाक्यातून ध्वनीत होते. याचा अर्थ 'जावामध्ये एकदा तयार केलेले सॉफ्टवेर, जावा असलेल्या दुसऱ्या कुठल्याही कॉंप्युटर सिस्टिमवर चालते' असा आहे. जावा ही पूर्णपणे वस्तुनिष्ठ संगणक आज्ञावली आहे. म्हणजे जावातील सर्व आज्ञा विशिष्ठ वर्गात लिहिल्या जातात.
मग या वर्गाची वस्तू (ऑब्जेक्ट) तयार करून आपल्याला त्यातील आज्ञा कार्यान्वित करता येतात. अश्या कितीही वस्तू आपण तयार करू शकतो म्हणूनच जावा ही कोड-पुनर्वापराला मदत करते.
एका प्राथमिक आज्ञावलीचे उदाहरण:
हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello World" अशी अक्षरे दिसतील.
एका प्राथमिक आज्ञावलीचे उदाहरण:
हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Welcome to World of Core Java Programming" अशी अक्षरे दिसतील.
जावा (आज्ञावली भाषा)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.