जावळी तालुका

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर अशा २ भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले.

तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर ही बाजारपेठेची गावं आहेत.

जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो. जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →