जाल्त्सबुर्ग (जर्मन: Salzburg) हे ऑस्ट्रिया देशाचे एक राज्य आहे. देशाच्या पश्चिम भागातील आल्प्स पर्वतरांगेत वसलेल्या जाल्त्सबुर्गच्या पूर्वेस ओबरओस्टराईश व श्टायरमार्क, दक्षिणेस व पश्चिमेस तिरोल तर दक्षिणेस क्यार्न्टन ही राज्ये तर वायव्येस जर्मनीचे बायर्न हे राज्य आहेत.
जाल्त्सबुर्ग ह्याच नावाचे शहर जाल्त्सबुर्गची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ह्या राज्याची लोकसंख्या इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे.
जाल्त्सबुर्ग (राज्य)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.