जाफ्राबाद हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्याचा एक तालुका आहे. जाफ्राबाद तालुक्यात जाफ्राबाद शहरासह १०० गावे आहेत. जाफ्राबाद शहराजवळून धामणा व पूर्णा या नद्या वाहतात. पूर्णा नदीवर खडकपूर्णा धरण उभारण्यात आले आहे. तालुक्यामध्ये मिरचीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. येथे तहसील आणि पंचायत समिती आहे. हे पूर्णा नदीच्या काठावर वसलेले एक लहान शहर आहे, येथील निसर्ग व जुन्या काळी जेजुरीदारांच्या निवासस्थानासाठी वापरली जाणारी किल्ला (फोर्ट) प्रसिद्ध आहे. जाफ्राबाद हे ठिकाण केंळणा आणि पूर्णा नदीच्या संगमावर वसलेले आहे. पूर्वी या ठिकाणाला मजबुत दगडी भिंतीची तटबंधी हेाती, मात्र काळाच्या ओघात त्याची वाताहत झाली आह. तथापि एक लहानशी गढी उत्तम स्थितीत आहे. या ठिकाणाचे नाव जाफ्राबादचा संस्थापक जाफर खान यांच्या नावावरून पडले आहे. मुघल बादशाह औरंगजेब यांनी इतर ११५ गावांसोबत या ठिकाणाची जहागीरी जाफर खानला सोपवीली हेाती. जाफ्राबादमध्ये एकूण सात मशिदी आणि मंदिरे उभारण्यात आलेली होती. यातील प्रमुख मशिदीवर बादशाह औरंगजेब यांच्या आदेशाने रिजाजत खान यांनी पर्शियन भाषेत १०७६ हिजरी संवतामध्ये (सन १६६४) नोंदी केल्या होत्या. तटबंदी उभारणीच्या दरम्यान एक सुंदर अशी पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. त्यावरील नोंदीनुसार याचे निर्माण बादशाह शाहजहान| यांच्या आदेश नुसार मुस्तफा खान यांनी १०४० [[हिजरी वर्ष|हिजरी संवतमध्ये (सन १६३०) मध्ये केल्याचे दिसून येते.
(ही माहिती भारताचे राजपत्र, महाराष्ट्र राज्य, औरंगाबाद जिल्हा पृष्ठ क्र १०१७, १०१८ येथून घेण्यात आली आहे)
जाफ्राबाद तालुका
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.