जयबाजीराव मुकणे

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

जयबाजीराव मुकणे

महाराज जयबाजीराव मुकणे हे जव्हार संस्थानचे संस्थापक आणि प्रथम राजे होते. त्यांचे मूळ नाव जयदेवराव नायक (नाईक) होते. जयबाजीराव हे क्षत्रिय महादेव कोळी घराण्यातील वारस तथा प्रमुख राजे होते.



जयहर साम्राज्यचे (जव्हार राज्य)चे संस्थापक आणि प्रथम महाराज. प्रतिकूल परिस्थिती मध्ये अनेकांना पराभूत करून राज्य स्थापन केले. सदानंद महाराज यांच्या आशिर्वादामुळे राज्य स्थापन केले. धरमपूर,पेठ,बागलाण ही राज्ये जिंकली. देवगिरी,सुरत आणि नाशिक दरबार मध्ये मोठा मान होता. आजच्या ठाणे,पालघर,नाशिक, अहमदनगर या महाराष्ट्रतील आणि वलसाड,डांग,नवसरी या गुजरात राज्यातील जिल्ह्यात राज्य पसरले होते अनेक किल्ले जिंकले. शहरे,मंदिरे,मठ आणि अश्या अनेक वास्तू बांधल्या. जयदेवराव हे पराक्रमी शासक होते त्यांचा विवाह सिसोदिया राजपूत घराण्यातील मोहनादेवी यांच्याशी झाला त्यांना दोन पराक्रमी पुत्र होते. अल्लाउद्दीन खिलजीच्या काळात अनेक देवगिरी वर आक्रमणे झाली तेव्हा राज्य स्थापन केले. जयदेवराव यांचे वडील देवगिरी साम्राज्यात मोठे सरदार होते.



इ.स. १३१६ मध्ये जव्हार संस्थानाला आकार येत होता. जयबा राजांना धुळबाराव आणि होळकरराव ही दोन अपत्ये होती. जयबा हे शिवशंकराचे भक्त होते. त्यांनी राज्याभिषेकानंतर पूर्वी काळवण संबोधल्या जाणाऱ्या या प्रदेशाला आपल्या नावातला जय आणि शिवशंकराचे हर असे मिळून जयहर नम असे नामकरण केले. पुढे जयहरचा अपभ्रंश होऊन जव्हार असे नाव रूढ झाले.त्यावेळी त्यांची सत्ता उत्तरेकडे सुरतपासून ते दक्षिणेकडे कल्याण पर्यंत आणि पूर्वेला बागलाण पासून पश्चिमकडे अरबी समुद्रापर्यंत होती. त्यावेळी रामनगर, सुरगाणा,पेठ,डांग आणि बागलाण राज्ये जव्हारच्या अंकित होती. वारली राजाला हरवून राज्य स्थापन केले. मुस्लिम आक्रमन पासून अनेकांना त्यांनी जव्हार मध्ये आश्रय दिला

इसवी सन १३४१ ते १७५८ सालापर्यंत जव्हारच्या राजाकडे दमण नदीपर्यंतचा, सह्याद्रीपर्यंतचा आणि भिंवडीपर्यंतचा भूप्रदेश ताब्यात होता. त्यावेळी राजाकडे साडेतीन लाख रुपयापर्यंत महसूल गोळा व्हायचा.

जयबाजीराव मुकणे यांनी इ.स. १३०६ मध्ये डहाणू येथील महालक्ष्मी मंदिर बांधले.पिपंरी टाकेद येथे सदानंद महाराजबाबा किंवा सैफूउद्दीनबाबा यांच्या साठी मंदिर बांधले. तसेच अनेक महादेवाची मंदिरे बांधली आणि अनेक किल्ले बांधले

जयबाजीरावच्या मुलाने म्हणजे, धुळबाराव मुकणे (नंतरचे नाव नेमशाह मुकणे) यांनी तब्बल 32 किल्ले जिंकून साम्राज्यविस्तार केला. यामुळे ५ जून १३४३ रोजी दिल्लीचा तत्कालीन सुल्तान मुहम्मद बिन तुघलक ने महाराज धुळबाजी यांना शाह ही उपाधि देऊन सम्मानित केले आणि प्रथमच स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला.. इथून पुढे धुळबाजीराव नेमशाह नावाने ओळखले जात होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →