किकुझुकी (जपानी:菊月) ही जपानच्या शाही आरमाराची विनाशिका होती. या नौकेला जपानी दिनदर्शिकेतील नवव्या महिन्याचे नाव देण्यात आले होते.
ही मुत्सुकी प्रकारच्या १२ विनाशिकांपैकी एक होती. दुसऱ्या महायुद्धात या नौकेने गुआमची लढाई, न्यू गिनी आणि सोलोमन द्वीपांची मोहीम यांसह अनेक लढायांत भाग घेतला. मे १९४२मध्ये कॉरल समुद्राच्या लढाई दरम्यान तुलागीवर आक्रमण करीत असताना किकुझुकीचे दोस्त राष्ट्रांच्या आरमाराने मोठे नुकसान केले. जपानच्या तोशी मारू क्र. ३ या नौकेने किकुझुकीला जवळच्या पुळणीपर्यंत ओढत नेले परंतु नंतर आलेल्या भरतीत किकुझुकी समुद्रात ओढली गेली व बुडाली. तुलागीवरून जपान्यांना मागे रेटल्यावर अमेरिकेच्या आरमाराने किकुझुकीला तरंगते केले व पूर्ण झडती घेतली. ही नौका आजही तेथेच अर्धवट बुडलेल्या स्थितीत पडून आहे.
जपानी विनाशिका किकुझुकी (१९२६)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?