जनक कृत्रिम बुद्धीमत्ता ( जनरेटिव्ह अेआई, जेन अेआई, किंवा GAI ) ही कृत्रिम बुद्धिमत्ता आहे जी जनरेटिव्ह मॉडेल्सचा वापर करून मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ किंवा इतर दत्तांश तयार करण्यास सक्षम आहे, अनेकदा सूचना प्रतिसाद म्हणून. जनक कृत्रिम बुद्धीमत्ता प्रतिमाने त्यांच्या निविष्ट प्रशिक्षण डेटाचे नमुने आणि संरचना शिकतात आणि नंतर साम्य वैशिष्ट्ये असलेला नवीन दत्तांश तयार करतात.
रूपांतरण -आधारित सखोल चेतनी संजाळ(डीप न्यूरल नेटवर्क), विशेषतः विशाल भाषा प्रतिमाने (LLM) मधील सुधारणांमुळे २०२० च्या दशकाच्या प्रारंभी जनक अेआई प्रणालींची अेआई वृद्धी सक्षम झाली. यामध्ये चॅटजीपीटी, कोपायलट, जेमिनी आणि अॅलअॅलएअॅमए सारखे चॅटबॉट्स, मजकूर-टू-प्रतिमा कृत्रिम बुद्धिमत्ता प्रतिमा निर्मिती प्रणाली जसे की स्टेबल डीफ्युझन, मिडजर्नी आणि डॉल-इ, आणि मजकूर-ते-दृकचित्र अेआई जनित्र जसे की सोरा यांचा सामावेश आहे. ओपनअेआई, अॅन्थ्रोपिक, मायक्रोसॉफ्ट, गूगल, आणि बाइडू सारख्या कंपन्या तसेच असंख्य लहान कंपन्यांनी जनक अेआई प्रतिमाने विकसित केली आहेत.
जनकसूत्री कृत्रिम बुद्धीमत्ता
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.