चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (CPCL) पूर्वी मद्रास रिफायनरीज लिमिटेड (MRL) म्हणून ओळखली जाणारी, ही इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची उपकंपनी आहे जी भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मालकीखाली आहे. याचे मुख्यालय चेन्नई येथे आहे.
१९६५ मध्ये भारत सरकार (GOI), अमोको आणि नॅशनल इराणी ऑइल कंपनी (NIOC) यांच्यात संयुक्त उपक्रम म्हणून याची स्थापना करण्यात आली होती, ज्यात अनुक्रमे ७४%: १३%: १३% या प्रमाणात हिस्से होते. सीपीसीएल रिफायनरीने ४३० दशलक्ष (US$९.५५ दशलक्ष) खर्चून प्रतिवर्ष २.५ दशलक्ष टन स्थापित क्षमतेसह उत्पादन सुरू केले.
सीपीसीएल च्या दोन रिफायनरी आहेत ज्यांची एकत्रित शुद्धीकरण क्षमता प्रतिवर्ष ११.५ दशलक्ष टन आहे. चेन्नईतील मनळी रिफायनरीची क्षमता प्रतिवर्ष १०.५ दशलक्ष टन आहे व नागपट्टिनम रिफायनरीची प्रतिवर्षी १ दशलक्ष टन क्षमता आहे. आता या १ दशलक्ष टन प्रतिवर्ष रिफायनरीची क्षमता २७,००० कोटी (US$५.९९ अब्ज) खर्चासह प्रतिवर्षी ९ दशलक्ष टन पर्यंत वाढवण्यासाठी योजीले आहे.
हे सरकारद्वारे मिनीरत्न -१ कंपनी म्हणून वर्गीकृत आहे.
चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.