चेतन दातार

यामागील विज्ञान आणि इतिहास.

चेतन दातार ( - २ आॅगस्ट २००८) हे एक मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्यरंगकर्मी होते. त्यांनी देवदासी प्रथा, समलैंगिकता यांसारख्या संवेदनशील विषयांवर नाटके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या 'एक माधव बाग' मधल्या स्वगताचे वाचन मोना आंबेगावकर करतात. या वाचनाचे प्रयोग महाराष्ट्रातील समलिंगी समुदायासाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांकडून व गटांद्वारे महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी झाले आहेत. एका समलिंगी तरुणाचे त्याच्या आईला पत्राद्वारे आपल्या लैंगिकतेबद्दल सांगणारे पत्र हा त्या नाटकाचा मुख्य विषय आहे. चेतन दातार यांनी अनेक जर्मन-इंग्रजी नाटकांची मराठी भाषांतरे केली होती. 'आविष्कार' नावाच्या नाट्यसंस्थेचे ते महत्त्वाचे आधारस्तंभ होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →