चार्ल्स एलिस चक शुमर (२३ नोव्हेंबर, १९५०:ब्रुकलिन, न्यू यॉर्क, अमेरिका - ) हे एक अमेरिकन राजकारणी आहेत. हे १९९९पासून अमेरिकेच्या सेनेटमध्ये न्यू यॉर्कचे प्रतिनिधित्व करीत आहेत. यांनी २०१७पासून सेनेटमधील डेमोक्रॅटिक पक्षाचे नेतृत्व केले आहे. २०२१ ते २०२५ दरम्यान ते सिनेट बहुमत नेते तर २०१७ ते २०२१ आणि २०२५ पासून सिनेट विरोधी पक्ष नेते होते. शुमर हे डॅनियल पॅट्रिक मोयनिहान यांच्या निवृत्तीनंतर २००१ मध्ये ते न्यू यॉर्कचे वरिष्ठ सिनेटर बनले. २०२२ मध्ये पाचव्या मुदतीसाठी निवडून आलेले शुमर यांनी न्यू यॉर्कमधील सर्वात जास्त काळ काम करणारे अमेरिकन सिनेटर म्हणून मोयनिहान आणि जेकब के. जाविट्स यांना मागे टाकले.
शूमर यांनी आयरिस वेनशॉल यांच्याशी २१ सप्टेंबर १९८० रोजी झाले वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उत्तर मिनाऱ्यावरील विंडोज ऑन द वर्ल्ड येथे लग्न केले. वेनशॉल २००० ते २००७ पर्यंत न्यू यॉर्क शहराच्या वाहतूक आयुक्त होत्या शूमर आणि वेनशॉल ग्रँड आर्मी प्लाझाजवळील पार्क स्लोपमध्ये राहतात. त्यांना दोन मुली आहेत.
चक शुमर
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.