चंद्रशेखर आगाशे

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

चंद्रशेखर आगाशे

चंद्रशेखर गोविंद आगाशे (जन्म: १४ फेब्रुवारी, १८८८ - ९ जून, १९५६) हे एक मराठी उद्योगपती होते. त्यांनी बृहन्महाराष्ट्र शुगर सिंडिकेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली. पुणे शहरात त्याच्या नावाचे चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि त्यांच्या नावाचा चंद्रशेखर आगाशे रस्ता आहे.

चंद्रशेखरांच्या पश्चात त्यांची दोन मुले पंडितराव आगाशे आणि ज्ञानेश्वर आगाशे यांनी बृहन्महाराष्ट्र साखर सिंडिकेट कंपनी चालवली. तर शकुंतला करंदीकर या त्यांच्या कन्या असून त्या एक मराठी लेखिका आणि समाजसेविका होत्या. त्यांनी आगाशे यांचे चरित्र"विश्वस्त" या नावाने प्रसिद्ध केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →