चंदीगड ही पंजाब व हरियाणा या दोन राज्यांची संयुक्त राजधानी व स्वतंत्र भारतात बांधले गेलेले पहिले पूर्वनियोजित शहर आहे. हे भारतातील सात केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. (इतर सहा केंद्रशासित प्रदेश - अंदमान आणि निकोबार, दीव आणि दमण, दादरा-नगर हवेली, राजधानी दिल्ली, पॉंडिचेरी, लक्षद्वीप). चंदीगडचे क्षेत्रफळ ११४ चौ.किमी. व लोकसंख्या १०,५४,६८६ एवढी आहे. पंजाबी व हिंदी ह्या चंदीगडच्या प्रमुख भाषा आहेत. गहू आणि भात ही येथील प्रमुख पिके आहेत. चंदीगडची साक्षरता ८६.४३ टक्के एवढी आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चंदिगढ
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.