चंगीझ खान

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

चंगीझ खान

चंगीझ खान किंवा चंगेझ खान (आंतरराष्ट्रीय उच्चारानुरूप अक्षर पद्धती: [ʧiŋgɪs χaːŋ]; मंगोलियन: Чингис Хаан, Činggis Qaɣan (चिंगिज खान)) किंवा (फारसी दस्त‍ऐवजांप्रमाणे) गेंगीझ खान (इ.स. ११६२ - इ.स. १२२७) हा बाराव्या शतकातील मंगोल सम्राट होता. त्याने मंगोलियातील सर्व टोळ्यांना एकत्र करून मंगोल साम्राज्याची स्थापना केली. त्याचे मूळ नाव तेमुजीन बोर्जिगीन होते. पाश्चात्य इतिहासकारांनी चंगीझ खानाचे वर्णन रक्तपिपासू, क्रूरकर्मा जगज्जेता असे केले असले तरी मंगोलियात त्याला राष्ट्रपित्याचा दर्जा आहे. जगातल्या सर्वांत शक्तिशाली व यशस्वी शासकांमध्ये चंगीझ खानाची गणना होते. इ.स. १२२७ नंतर मंगोल राजघराण्यातर्फे नमूद केलेल्या मंगोलियाचा गुप्त इतिहास या दस्तऐवजांवरून चंगीझच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा आढावा घेता येतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →