ग्रॅहाम स्टेन्स (१८ जानेवारी १९४१ - २३ जानेवारी १९९९) हा ऑस्ट्रेलियाचा ख्रिश्चन धर्मप्रचारक होता.
तो व त्याचे सगळे कुटुंब भारतातील ओडिशा राज्यात ख्रिश्चन धर्मप्रसाराचे आणि गरीब व कुष्ठरोगपिडीत नागरिकांना साहाय्य करण्याचे काम करीत.
जानेवारी २३, १९९९ च्या रात्री स्टेन्स व त्याची दोन मुले फिलिप (वय १० वर्षे) व टिमोथी (वय ७ वर्षे) आपल्या मोटारीत झोपलेले असताना बजरंग दलाच्या काही समाजकंटकांनी मोटारीस आग लावली. त्यात तिघांचा मृत्यू झाला.
२००३ मध्ये, आग लावणाऱ्यांपैकी दारा सिंह यास मृत्युदंड तर अन्य १२ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
ग्रॅहाम स्टेन्स
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!