गोरेवाडा तलाव (नागपूर)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

गोरेवाडा हा तलाव नागपूरच्या गोंड राजाचे शासनकाळात,सीता नावाच्या गोंड समाजाच्या महिलेने बांधला. पूर्वी या तलावाचे नाव 'सीतागोंडीन तलाव' असे होते. सध्या नागपूर शहराच्या सुमारे अर्ध्या भागात पाणीपुरवठा करणारा तलाव म्हणुन या तलावाची ख्याती आहे. सन १९८२ साली हा तलाव नागपूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट करण्यात आला.नागपूरच्या वायव्य दिशेला असणाऱ्या, नागपूर काटोल रस्त्यावर गोरेवाडा गावाजवळ असल्यामुळे नंतर याचे नाव गोरेवाडा असे ठेवण्यात आले.यास २३५० फूट लांब व सुमारे ५२ फूट उंच मातीचा बांध घालण्यात आला.तेथे जलशुद्धीकरण केंद्र उभारल्या गेले.पूर्वी या तलावाचे काम मेजर ओल्ढन या अभियंत्याने पूर्ण केले. त्याचे नावाची कोनशिला येथे अस्तित्वात आहे.

या योजनेचे काम १९०९ साली सुरू करण्यात येउन ते ऑक्टोबर १९११ साली पूर्ण झाले.या पाणीपुरवठ्यासाठी नागपूर नगरपालिकेने त्यापोटी वाहनकर लावला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →