गोठ हा बायकांनी मनगटात घालायचा दागिना आहे. हा अनेक शतकांपासून वापरला जातो. गोठ हा एकावेळी दोन्ही हातात घातला जातो. हा दागिना सोन्याच्या भरीव किंवा पोकळ नळीपासून बनविलेला असून जाड गुळगुळीत बांगडीसारखा दिसतो. भरीव गोठात लाख भरलेली असते.
गोठ,पाटल्या, बिलवर,तोडे हे बांगड्यांचे प्रकार आहेत. त्यापैकी पाटल्या, बिलवर रोज घातले जातात तर तोडे, गोठ विशेष प्रसंगी घातले जातात.
गोठ तयार करण्यासाठी सोनार जे हत्यार वापरतात, त्याला गोठघोळणी असे म्हणतात. गोठ हे सोने धातू व प्लास्टिक मध्ये पण असतात.
गोठ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.