गुळवेल किंवा गुडूची (शास्त्रीय नाव: Tinospora cordifolia, टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया) हृदयाच्या आकाराची पाने म्हणून कॉर्डिफोलिया हे नाव पडले. भारत, श्रीलंका, म्यानमार अशा उष्णकटिबंधीय प्रदेशांत आढळणारी गुळवेल ही एक वेल आहे. हिला अमृतवेल म्हणतात. गुळवेलला हिंदी भाषेत गिलोय म्हणूनही ओळखले जाते. या वनस्पतीचे सत्त्व औषध म्हणून वापरतात. त्याला गुळवेलसत्त्व असे नाव आहे. गुळवेलच्या पानांचा स्वाद कडू आणि तिखट असतो. गुळवेलचा उपयोग करून वात पित्त आणि कफ चांगले केले जाऊ शकतात. गुळवेलचा उपयोग करतांना त्याचे खोड वापरले जाते. आजकाल बाजारात गुळवेलच्या खोडा पासून बनवलेल्या गोळ्या देखील उपलब्ध आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुळवेल
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?