गुंडे (२०१४ चित्रपट)

या विषयावर तज्ञ बना.

गुंडे (२०१४ चित्रपट)

गुंडे हा २०१४ चा हिंदी भाषेतील अ‍ॅक्शन थरार चित्रपट आहे जो अली अब्बास जफर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे आणि यशराज फिल्म्स अंतर्गत आदित्य चोप्रा यांनी निर्मित केला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन कपूर, प्रियांका चोप्रा आणि इरफान खान मुख्य भूमिकेत आहेत. १९७१-८८ च्या काळात कलकत्ता येथे घडणारा हा चित्रपट दोन जिवलग मित्रांची कथा सांगतो जे दोघेही एका कॅबरे डान्सरच्या प्रेमात पडतात, ज्यामुळे त्यांच्यात शत्रुत्व आणि गैरसमज निर्माण होतात आणि एक पोलिस अधिकारी या परिस्थितीचा फायदा घेतो.

गुंडे चित्रपट हा १४ फेब्रुवारी २०१४ (व्हॅलेंटाईन्स डे) रोजी प्रदर्शित झाला, ज्याला समीक्षकांकडून संमिश्र सकारात्मक प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी झाला व बॉक्स ऑफिसवर त्याने १.३१ अब्ज कमाई केली आणि २०१४ मधील सर्वाधिक कमाई करणारा १० वा हिंदी चित्रपट बनला. या चित्रपटाने ६० व्या फिल्मफेर पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अ‍ॅक्शन पुरस्कार जिंकला आणि "तुने मारी एन्ट्रीयां" या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठी नामांकन मिळाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →