गिजरा (इंग्लिश: scaup duck;हिंदी: कालकन्ठ हंस) हा एक पाणपक्षी आहे.
हा आकाराने बदकापेक्षा लहान पक्षी आहे. नर पक्ष्याचे काळे डोके,मान आणि छाती ,तसेच,खालचा भाग पांढरा, शेपटी काळी,डोक्यावर हिरव्या रंगाची झाक असते. मादी दिसायला काळ्या बरडयाच्या मादिप्रमाणे असते,परंतु तोंड व चोचीच्या मुळाशी पांढरा पट्टा स्पष्ट दिसतो.
वितरण
पाकिस्तान,उत्तर भारत ते महाराष्ट्र (पनवेल व अहमदनगर),पूर्वेकडे बांगलादेश ते ब्रह्मदेश.हिवाळ्यात भटके.भारतात प्रामुख्याने गोड्या पाण्याच्या सरोवरात आणि समुद्रकिनाऱ्यावर आढळून येतात.
गिजरा
या विषयातील रहस्ये उलगडा.