गाडवी नदी ही महाराष्ट्रातील पूर्व विदर्भातील एक महत्त्वाची नदी आहे. या नदीचा उगम गोंदिया जिल्ह्याच्या पूर्व सीमेजवळील चिचगड भागातील ढासगड येथील टेकड्यांमध्ये होतो. मुख्यतः गोंदिया आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या भौगोलिक सीमेवरून वाहत जाणारी ही नदी वैनगंगा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. पुढे प्रवास करत ही नदी गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी तालुक्यात असलेल्या शिवणी गावाजवळ वैनगंगा नदीला जाऊन मिळते.
या नदीचा प्रवाह गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि गडचिरोलीतील देसाईगंज व आरमोरी परिसरातील कृषी आणि सामाजिक जीवनासाठी महत्वाचा आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यात गोठणगावजवळ गाढवी नदीवर इतियाडोह धरण उभारण्यात आले आहे. या धरणाच्या पाण्याच्या साहाय्याने दोन्ही जिल्ह्यांतील शेकडो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा मिळते, विशेषतः भात (धान) पिकासाठी हे पाणी अत्यंत उपयुक्त ठरते. या नदीच्या खोऱ्यात जैविक विविधता आढळते..
गाडवी नदी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.