गनिसन अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील शहर आहे. गनिसन काउंटीचे प्रशासकीय केन्द्र असलेल्या या शहराची लोकसंख्या ६,५६० होती.
गनिसन नदी शहराच्या जवळून वाहते. या नदीने डोंगरात कोरलेली घळ ब्लॅक कॅन्यन ऑफ द गनिसन येथून जवळ आहे.
येथील गनिसन प्रादेशिक विमानतळापासून डेन्व्हर, डॅलस-फोर्ट वर्थ आणि ह्युस्टनला विमानसेवा आहे.
गनिसन (कॉलोराडो)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.