गदर २

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गदर २ हा २०२३ मधील हिंदी-भाषेतील अनिल शर्मा दिग्दर्शित आणि निर्मित, आणि शक्तिमान तलवार लिखित अ‍ॅक्शन नाट्यपट आहे. २००१ मध्ये आलेल्या गदर: एक प्रेम कथा या चित्रपटाचा हा उत्तरभाग असून, या चित्रपटात सनी देओल, अमीशा पटेल आणि उत्कर्ष शर्मा यांनी त्यांच्या भूमिकांची पुनरावृत्ती केली आहे. चित्रपटात १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान तुरुंगात असलेला त्याचा मुलगा चरणजीत "जीते" सिंग याच्या सुटकेसाठी तारा सिंग हा पाकिस्तानला परत जातो.

गदर २ हा ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रदर्शित झाला. ४३० कोटी (US$९५.४६ दशलक्ष) पेक्षा जास्त कमाई करून हा चित्रपट २०२३चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट आणि २०२३ चा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट म्हणून उदयास आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →