खो-खो हा एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. हा प्राचीन भारतातील सर्वात जुन्या मैदानी खेळांपैकी एक आहे. भारतीय उपखंडातील दोन सर्वात लोकप्रिय पारंपरिक टॅग खेळांमध्ये खो-खो आणि कबड्डीचा समावेश होतो.
खो-खो दोन संघांद्वारे खेळला जातो, ज्यामध्ये पंधरापैकी बारा खेळाडू असतात. यातले नऊ खेळाडू गुडघ्यांवर बसून मैदानात प्रवेश करतात (चेझिंग टीम) ,आणि तीन अतिरिक्त (बचाव करणारा संघ) खेळाडू विरोधी संघाच्या सदस्यांचा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करतात. हा खेळ संपूर्ण दक्षिण आशियामध्ये मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांसारख्या दक्षिण आशियाच्या बाहेरील प्रदेशांमध्येही तो खेळला जातो. हा भारत आणि पाकिस्तानमधील शाळकरी मुलांद्वारे नेहमी खेळला जातो, हा एक स्पर्धात्मक खेळ आहे. खो-खो असा खेळ आहे जो तग धरण्याची क्षमता वाढविण्यास मदत करतो आणि शालेय मुलांच्या सामाजिक आणि मानसिक विकासास मदत करतो.
खो-खो
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.