खेळपट्टी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

क्रिकेट ह्या खेळात, क्रिकेट खेळपट्टी म्हणजे क्रिकेट मैदानाच्या मध्यभागी विकेटच्या मधील एक २०.१२ मी (२२ यार्ड) लांब आणि ३.०५ मी (१० फूट रुंद) पट्टी होय. खेळपट्टीचा पृष्ठभाग हा सपाट आणि सामान्यत: खुरट्या गवताने अाच्छादलेला असतो.

जगात काही ठिकाणी हौशी सामन्यांसाठी कृत्रिम खेळपट्टी वापरली जाते. ही खेळपट्टी म्हणजे काथ्याची मॅट किंवा कृत्रिम टर्फ अंथरलेल्या कॉंक्रीटच्या स्लॅबपासून बनवलेली असते, काही वेळा काथ्याच्या मॅट किंवा चटईवर ती अस्सल खेळपट्टी वाटावी म्हणून माती टाकतात. परंतु व्यावसायिक क्रिकेटमध्ये कृत्रिम खेळपट्टी दुर्मिळ आहे. ज्या ठिकाणी क्रिकेट सामान्यतः खेळले जात नाही अशा ठिकाणी एखादा प्रदर्शनीय सामना अशी खेळपट्टीवर खेळवला जातो.

खेळपट्टीवर क्रिकेटच्या नियमांमध्ये निर्देशत केल्याप्रमाणे क्रीज आखलेले असतात.

विकेट हा शब्द साधारणपणे खेळपट्टीच्या संदर्भात उद्भवतो. परंतु क्रिकेटच्या नियमांनुसार (नियम ७ मध्ये खेळपट्टी आणि नियम ८ विकेट, त्यामधील फरक दर्शवतात) तांत्रिकदृष्ट्या ते चुकीचे आहे. क्रिकेट खेळाडू, चाहते आणि समालोचक त्याचा वापर कोणत्याही शक्य संदिग्धतेशिवाय संदर्भांमध्ये करतात. ट्रॅक हा खेळपट्टीसाठी आणखी एक समानार्थी शब्द आहे.

क्रिकेटमैदानाच्या मध्यभागी खेळपट्टीसाठी वापरल्या जाणाऱ्या क्षेत्राला स्क्वेअर असे म्हणतात. क्रिकेटची खेळपट्टी ही सहसा व्यावहारिकदृष्ट्या दक्षिणोत्तर दिशेने असते, कारण तसे नसल्यास दुपारच्यावेळी सूर्यामुळे पश्चिमेकडे तोंड असलेल्या फलंदाजाला ते त्रासदायक वाटू शकते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →