खंडाळा तालुका

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

खंडाळा हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक शहरवजा खेडे व तालुक्याचे ठिकाण आहे. नीरा नदी या क्षेत्रातून वाहते. हे ठिकाण सातारा जिल्ह्याच्या उत्तरेकडे आहे. या खंडाळा तालुक्यात खंडाळा, शिरवळ व लोणंद ही मोठी गावे आहेत. खंडाळा व लोणंद या दोन्ही ठिकाणी स्वतंत्र नगरपंचायती आहेत.

शिरवळमध्ये दोन टप्प्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वसलेले आहे, तर खंडाळा औद्योगिक वसाहत ही केसुर्डी या गावाच्या हद्दीत वसलेली आहे. खंडाळा तालुक्याचे तालुक्यातून प्रशासकीय कारणांसाठी विभाजन करण्यात आले, त्यामुळे खंडाळा व महाबळेश्वर हे तालुके नव्याने अस्तित्वात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →