कोरफड

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

कोरफड

कोरफड ही एक औषधी वनस्पती आहे. हिला संस्कृतमध्ये कुमारी आणि इंग्रजीत ॲलो (Aloe) म्हणतात. हिच्यापासून कुमारी आसव हे परंपरागत आयुर्वेदिक औषध होते.

कोरफडीचा रस आरोग्यदायी आहे. कोरफडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ‘ए’, ‘सी’, ‘बी1’, ‘बी2’, बी3’, ‘बी6’, फाॅलिक ॲसिड हे घटक असतात. तर मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश करावा अशी काहीची शिफारस आहे.

कोरफड ही एकाच ॲलो नावाच्या कुळातल्या ५०० प्रजातींपैकी एक प्रजाती आहे. याकुळात काही पुष्पवंत वनस्पतीदेखील येतात. सर्वात परिचित प्रजाती म्हणजे कोर्या व्हेरा, किंवा "खरी कोरफड" होय.मिश्रित फार्मास्युटिकल उद्दिष्टांसाठी तथाकथित "कोरफड व्हेरा" प्रमाण मानली जाते. ॲलो फेरोक्ससारख्या इतर प्रजातींची लागवड आणि कापणी जंगलांमधून केली जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →