कोन्स्टान्स सरोवर किंवा बोडनसे (जर्मन: Bodensee) हे युरोपातील एक मोठे सरोवर आहे. आल्प्स पर्वतरांगेच्या उत्तर पायथ्याशी ऱ्हाईन नदीवर असलेल्या ह्या सरोवराचा जगातील महत्त्वाच्या गोड्या पाण्याच्या सरोवरांमध्ये समावेश होतो. सरोवराच्या भोवताली जर्मनीची बाडेन-व्युर्टेंबर्ग व बायर्न ही राज्ये, ऑस्ट्रियाचे फोरार्लबर्ग हे राज्य तर स्वित्झर्लंडची थुर्गाउ व सांक्ट गालेन ही राज्ये वसलेली आहेत.
हे सरोवर समुद्रसपाटीपासून ३९५ मी उंचीवर स्थित आहे. याची लांबी ६३ किमी असून रुंदी साधारणपणे १४ किमी आहे. याचे आकारमान ५७१ किमी-वर्ग असून युरोपातील तिसरे सर्वात मोठे सरोवर आहे. हे सरोवर मुख्यत्वे ऱ्हाइन नदीचाच एक भाग असून हिमयुगात त्याची उत्पत्ती झाली.
सरोवराचे चार मुख्य भाग आहेत.
१. ओबर-से (भाषांतर- सरोवराचा वरचा भाग)
२. युबरलिंगर- से
३ उंटर-से (भाषांतर- सरोवराचा खालचा भाग)
४ ग्नाड-से
कोन्स्टान्स सरोवर
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!