कॉकेशस पर्वतरांग

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

कॉकेशस पर्वतरांग

काॅकेशस (तुर्की: Kafkas; अझरबैजानी: Qafqaz; आर्मेनियन: Կովկասյան լեռներ; जॉर्जियन: კავკასიონი; चेचन: Kavkazan lämnaš; रशियन: Кавказские горы) ही युरेशिया खंडाच्या काॅकेशस प्रदेशातील एक पर्वतरांग आहे. कॅस्पियन समुद्र व काळा समुद्र ह्यांच्या मधल्या भागात असलेली ही पर्वतरांग १,१०० किलोमीटर (६८० मैल) लांब आहे व बरेचदा युरोप व आशिया ह्यांच्यातील सीमा ठरवण्यासाठी वापरली जाते.

रशियाच्या काबार्डिनो-बाल्कारिया प्रजासत्ताक व काराचाय-चेर्केस प्रजासत्ताक येथील माउंट एल्ब्रुस (उंची: ५,६४२ मी (१८,५१० फूट)) हे काॅकेशस पर्वतरांगेतील व युरोपातील सर्वात उंच शिखर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →