केवडा (अन्य मराठी नावे: केतकी ; शास्त्रीय नाव: Pandanus Odoratissimus, पांदानस ओडोटिसिमस ; इंग्लिश: Screw Pine, स्क्रू पाइन ;) ही आग्नेय आशिया, दक्षिण आशिया या प्रदेशांत आढळणारी सुगंधी वनस्पती आहे. केवड्याची नर व मादी झाडे वेगवेगळी असतात. याचे कणीस म्हणजे नरफूल २५-५० से.मी. लांब असते. त्यात ५-१० से.मी. लांब अनेक तुरे असतात व त्यावर पांढरट पिवळे सुगंधी आवरण असते, तर मादी फूल लहान असून (५ से. मी.) त्याचे पुढे पिवळे व पिकल्यानंतर लाल रंगाचे लंबगोल १५-२५ से. मी. लांबीचे फळ तयार होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →केवडा
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.