कैकुश्रू माणेकजी उर्फ केकी मूस (२ ऑक्टोबर, १९१२ - ३१ डिसेंबर, १९८९)
मुंबईत जन्मलेले व पुर्व खान्देशातील चाळीसगांव येथे राहिलेले जागतिक कीर्तीचे चित्रकार व छायाचित्रकार होते.
त्यांची "टेबल टॉप फोटोग्राफी" जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकीने कामे केली. त्याच्या टेबलटॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पारितोषिके मिळाली.मराठी इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, हिंदी, गुजराती, उर्दू या भाषा त्याला अवगत होत्या. फिंसेंत फान घोचे चरित्र मूस याने मराठीत अनुवादित केले होते.
केकी मूस
या विषयावर तज्ञ बना.