के हुवी क्वान

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

के हुवी क्वान

के हुवी क्वान (जन्म २० ऑगस्ट १९७०) जो जोनाथन के क्वान म्हणूनही ओळखला जातो, हा व्हिएतनामी-अमेरिकन अभिनेता आहे. बालकलाकार म्हणून, क्वानने इंडियाना जोन्स अँड द टेंपल ऑफ डूम (१९८४) आणि द गुनीज (१९८५) मध्ये प्रसिद्धी मिळवली. १९९० च्या दशकात एक तरुण म्हणून काही भूमिका केल्यानंतर, त्याने १९ वर्षे अभिनयातून विराम घेतला, ज्या दरम्यान त्याने स्टंट कोरिओग्राफर आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले.

कौटुंबिक चित्रपट फाइंडिंग ʻओहाना (२०२१) मध्ये क्वान अभिनयात परतले. त्यानंतर समीक्षकांनी प्रशंसनीय एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल ॲट वन्स (२०२२) मध्ये त्यांना एक ऑस्कर पुरस्कार, गोल्डन ग्लोब आणि स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले सहाय्यक अभिनेता म्हणून. क्वान आणि हेंग एस. एनगोर हे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार जिंकणारे आशियाई वंशाचे दोन अभिनेते आहेत आणि क्वान हा ऑस्कर पुरस्कार जिंकणारा पहिला व्हिएतनाममध्ये जन्मलेला अभिनेता आहे. टाईम मॅगझिनने २०२३ मध्ये जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून त्यांचे नाव दिले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →