कॅम्पी फ्लेग्रेई तथा फ्लेग्रेअन फील्ड्स हा इटलीच्या नेपल्स शहराच्या पश्चिमेला असलेला एक मोठा कॅल्डेरा ज्वालामुखी आहे. हा कॅम्पेनियन ज्वालामुखीच्या कमानीचा भाग आहे. नेपल्सच्या पूर्वेस सुमारे ९ किमी (६ मैल) अंतरावर असलेल्या वेसुव्हियस ज्वालामुख ही याच कमानीत आहे. कॅम्पी फ्ल्ग्रेईचे निरीक्षण वेसुव्हियस वेधशाळेद्वारे केले जाते. २००३ मध्ये याला इटलीचे प्रादेशिक उद्यान म्हणून घोषित करण्यात आले.
काल्डेराच्या क्षेत्रामध्ये २४ विवरे आणि ज्वालामुखी रचना आहेत. त्यापैकी बहुतांश नेपल्सच्या आखाताखाली आहेत. प्राचीन रोममध्ये अग्नीचा देव व्हल्कन याचे घर असल्याचे मानले जात असलेल्या सोल्फातारा विवरात या क्षेत्रात आहे. समुद्री जीवांच्या अवशेषांवरून येथील पाण्याची पातळी इतिहासात वर-खाली गेलेली दिसून येते. या भागातील ल्युक्रिनो, अन्यानो आणि पोझुओली शहरांजवळ अद्याप गरम पाण्यांचे फवारे दिसतात.
कॅम्पी फ्ल्ग्रेईमध्ये नापोली प्रांताचे अन्याने आणि फुओरिग्रोटा, पोझुओली, बाकोली, माँते दि प्रोसिदा, क्वार्तो, फ्लेग्रेई बेटे, इस्किया, प्रोकिदा आणि विवारा यांचा समावेश आहे. सोल्फातारा विवरात २०१७ पर्यंत पायी चालत जाता येत असे.
कॅम्पी फ्लेग्रेई
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.