कृष्णनगर हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ पश्चिम बंगाल राज्यातील कृष्णनगर परिसरात स्थित असून ह्यामधील सर्व सात विधानसभा मतदारसंघ नदिया जिल्ह्यामध्ये आहेत. १९७१ ते १९९८ ह्या काळादरम्यान ह्या मतदारसंघावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे वर्चस्व होते. १९९८ आशियाई खेळ स्पर्धेमध्ये २ सुवर्णपदके मिळवणारी भारतीय धावपटू ज्योतीर्मयी सिकदर २००४ साली येथूनच लोकसभेवर निवडून आली होती.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कृष्णनगर लोकसभा मतदारसंघ
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.