कूर्म अवतार याला 'कच्छप अवतार' देखील म्हणतात.हा श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार मानला जातो,देव व दानवांनी अमृतप्राप्तीसाठी क्षीरसागर समुद्रात समुद्रमंथन केले होते. देव आणि दानवांनी मंदार पर्वताची रवी व वासुकी सर्पाची दोरी करून समुद्रमंथन केले. त्यावेळी भगवान विष्णूनी कूर्मावतार घेतला. कुर्मावताराच्या (कासवाच्या) रूपाने मंदार पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला. त्यामुळे देव आणि दानव सहजपणे समुद्र मंथन करू लागले. या समुद्रमंथनातून चौदा रत्ने मिळवले. कासव हे लक्ष्मीचे प्रतीक आहे.कुर्मा जयंतीचा सण वैशाख महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →कूर्म
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.