कुरुंदवाड संस्थान (थोरली पाती)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कुरुंदवाड संस्थान (थोरली पाती)

पटवर्धन घराण्याचे मूळ पुरुष हरभट पटवर्धन ह्यांचे तृतीय पुत्र त्रिंबक हरी पटवर्धन (अप्पासाहेब) हे कुरुंदवाड संस्थानाचे संस्थापक समजले जातात. मराठा सरदार राणोजी घोरपडे यांनी, अप्पासाहेबाकडून कर्ज घेतले होते. त्याची परतफेड म्हणून घोरपड्यांनी कुरुंदवाड हे आपले गाव अप्पाला बहाल केले.

अप्पासाहेबांची कारकीर्द इ.स.१७३३ ते इ.स. १७७१ अशी होती. पुढे इ.स. १८११ मध्ये कुरुंदवाडचे कुरुंदवाड आणि शेडबाळ असे दोन राज्यात विभाजन झाले. घराण्याला वारस नसल्याने शेडबाळ ब्रिटिश साम्राज्यात विलिन झाले. इ.स.१८५४ मध्ये कुरुंदवाड संस्थान पुन्हा विभागले जाऊन थोरली पाती रघुनाथरावाकडे तर, धाकटी पाती विनायकरावाकडे गेली. स्वातंत्र्यानंतर दोन्ही संस्थाने भारतात विलीन झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →