किल बिल भाग २ हा २००४ साली प्रदर्शित झालेला एक हॉलिवूड चित्रपट आहे. क्वेंटिन टारान्टिनोचे दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये उमा थर्मन नायिकेच्या भूमिकेमध्ये आहे. ह्या चित्रपटाचे कथानक लांब बनल्यामुळे तो २ भागांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. किल बिलचा पहिला भाग किल बिल भाग १ २००३ साली प्रदर्शित केला गेला होता.
किल बिलचे कथानक सूड ह्या विषयावर आधारित असून वधूच्या वेषामध्ये उमा थर्मन लग्नाच्या तयारीमध्ये असताना तिच्या भूतपूर्व गॅंगमधील माजी सहकारी व त्यांचा म्होरक्या बिल तिला गोळ्या घालतात. ह्या हल्ल्यामधून ती बचावते व सूडाने पेटून बिल व इतर सर्व सहकाऱ्यांसोबत बदला घेते. ह्या चित्रपटाचे पुष्कळसे चित्रण जपान व चीनमध्ये झाले.
किल बिलला टीकाकारांनी व प्रेक्षकांनी पसंत केले व हा चित्रपट यशस्वी ठरला. ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठी उमा थर्मनला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला.
किल बिल भाग २
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?