किम कॅम्पबेल

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

किम कॅम्पबेल

एव्हरिल फेड्रा डग्लस "किम" कॅम्पबेल (जन्म १० मार्च १९४७) ह्या कॅनडाच्या माजी राजकारणी, मुत्सद्दी, वकील आणि लेखक आहेत ज्यांनी २५ जून १९९३ ते ४ नोव्हेंबर १९९३ या छोट्या काळात कॅनडाचे १९ वे पंतप्रधान म्हणून काम केले.

कॅनडाच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्ये १९८८ मध्ये निवडून येण्यापूर्वी १९८६ मध्ये ब्रिटिश कोलंबिया सोशल क्रेडिट पार्टीचे सदस्य म्हणून कॅम्पबेल पहिल्यांदा ब्रिटिश कोलंबिया विधानसभेत निवडून आल्या होत्या. पंतप्रधान ब्रायन मुलरोनी यांच्या अंतर्गत त्यांनी १९९० ते १९९३ पर्यंत न्याय मंत्री आणि राष्ट्रीय संरक्षण मंत्री यासह अनेक कॅबिनेट पदांवर कार्य केले. लोकप्रियता कमी झाल्यामुळे मुलरोनी यांनी राजीनामा दिल्यानंतर जून १९९३ मध्ये कॅम्पबेल नवीन पंतप्रधान बनल्या. त्या वर्षाच्या ऑक्टोबरमध्ये १९९३ च्या कॅनेडियन फेडरल निवडणुकीत, प्रोग्रेसिव्ह कंझर्व्हेटिव्हचा पराभव झाला, व कॅम्पबेल पण स्वतः हरल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →