काळा प्लेग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

काळा प्लेग

काळा प्लेग, ब्लॅक डेथ किंवा काळा मृत्यू ही १३४६-५३ दरम्यान युरोपमध्ये पहिल्यांदा अवतरलेली महामारी होती. बुबोनिक प्लेगचा एक प्रकार असलेली ही महामारी मानवी इतिहासातील ही सर्वात घातक महामारी होती. यात अंदाजे ५ कोटी लोक मरण पावले, १४व्या शतकातील युरोपच्या लोकसंख्येपैकी ५०% यात बळी पडल्याचा अंदाज आहे. युरोपीय इतिहासातील सर्वात लक्षणीय घटनांपैकी एक असलेल्या साथीचा खोल आणि दूरगामी प्रभाव तेथील लोकसंख्या, संस्कृती आणि अर्थकारणावर पडला. या साथीने सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक उलथापालथी घडवून आणल्या



हा रोग येर्सिनिया पेस्टिस या जिवाणूमुळे होतो आणि पिसू व हवेतून पसरतो. काळ्या ब्लॅक डेथचे मूळ विवादित आहे. आनुवंशिक विश्लेषणातून असे संकेत आहेत की येर्सिनिया पेस्टिस बॅक्टेरिया सुमारे २,६०० वर्षांपूर्वी सध्याच्या किर्गिस्तान आणि चीनच्या सीमेवर असलेल्या तियान शान पर्वतांमध्ये विकसित झाले. मध्य आशिया, चीन, मध्य पूर्व आणि युरोपकडे निर्देश करणारेही काही पुरावे सापजल्याने या रोगाची उत्पत्ती आणि त्याचा उद्रेक अस्पष्ट आहे.

युरोपमध्ये काळ्या प्लेगचा प्रादुर्भाव सर्वप्रथम १३४७ साली क्रायमियामधील काफ्फा बंदराला मंगोल सेनापती जानी बेगच्या सोनेरी टोळधाडीतील सैनिकांत दिसल्याची नोंद आहे. येथून जिनोआला जाणाऱ्या जहाजांमधून बहुधा काळ्या उंदरांवर राहणाऱ्या पिसूंनी वाहून नेले होते. येथून ते ते भूमध्यसागरीय बंदरांतून पसरले इस्तंबूल, सिसिली आणि इटालियन द्वीपकल्प मार्गे उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया आणि उर्वरित युरोपमध्ये पोहोचले होते. एकदा हा रोग किनाऱ्यावर आल्यावर प्रामुख्याने न्यूमोनिक प्लेगच्या रूपात एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरल्याच्या नोंदीही आहेत. या साथीच्या जलद अंतर्देशीय प्रसारावरून कळून येते की याचे प्राथमिक वाहक उंदीरांवरील पिसूंपेक्षा अधिक वेगवान असे काहीतरी होते.

२०२२मध्ये असे आढळून आले की १३३० च्या दशकाच्या उत्तरार्धात आजच्या किर्गिझस्तानमध्ये काळ्या प्लेगमुळे झालेल्या मृत्यूंमध्ये अचानक वाढ झाली. अनुवांशिक पुराव्यांशी जोडल्यास याचा अर्थ असा होतो की काळ्या प्लेगचा सुरुवातीचा प्रसार पूर्वीच्या अनुमानानुसार १४व्या शतकातील मंगोल विजयांमुळे झाला नसावा.

काळा प्लेग ही मध्ययुगाच्या उत्तरार्धात युरोपवर आलेली ही दुसरी मोठी नैसर्गिक आपत्ती होती (पहिली म्हणजे 1ृ१३१५-१३१७चा मोठा दुष्काळ ) आणि त्यात युरोपीय लोकसंख्येचा ३०% ते ६०% लोकांचा तर मध्यपूर्वेतील लोकसंख्येचा ३३%. भाग मृत्युमुखी पडल्याचा अंदाज आहे.

मध्ययुगाच्या उत्तरार्धात काळ्या प्लेगचे आणखी अनेक उद्रेक झाले. सततच्या या महामाऱ्यांमुळे युरोपीय लोकसंख्येने १६व्या शतकापर्यंत १४व्या शतकातील पातळी परत मिळवली नाही. याच प्लेगचा उद्रेक १९व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जगभर परत परत होत राहिला. शेवटच्या साथीत भारतातही मोठी जीवितहानी झाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →