कान्होजी आंग्रे

या विषयावर तज्ञ बना.

कान्होजी आंग्रे

सरखेल कान्होजी आंग्रे (ऑगस्ट १६६९ - ४ जुलै, १७२९) हे १६ व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख होते. छ्त्रपती शिवाजी महाराज यांनी मराठा आरमाराची स्थापना करून कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुखपदी नेमणूक केली. त्यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आरमाराबरोबर लढून मराठा आरमाराचा भगवा समुद्रात फडकवत ठेवला. त्याकाळी भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजवण्यासाठी आणि मोक्याच्या ठिकाणची बंदरे, किल्ले काबीज करण्याची परकीय सत्तांमध्ये चढाओढ लागली होती. भारताच्या किनारपट्टीवरील बंदरे ताब्यात ठेवून आपला व्यापारी माल युरोपमध्ये पाठवण्यासाठी त्यांचा वापर करण्याची त्यांना आवश्यकता वाटत होती. सागरी व्यापाराचे संरक्षण करण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी सागरी किल्ले काबीज करणेही आवश्यक होते. कान्होजींनी या गोंधळाचा उपयोग आपले आरमार स्थापन करण्यापासून ते संपूर्ण किनारपट्टीवर अनिर्बंध सत्ता गाजवेपर्यंत केला. इंग्रज आणि पोर्तुगीज आरमाराच्या अथक प्रयत्नांनंतरही, कान्होजी आंग्रे यांच्या मृत्यू पर्यंत मराठा आरमार अजिंक्य राहिले.

आंग्रे यांचा जन्म १६६९ मध्ये रत्‍नागिरी जिल्ह्यातल्या हर्णे या गावी एका संकपाळ (मराठा) कुटुंबात (सध्याचे भिलारे) झाला. त्यांचे मूळ आडनाव कडू होते. संकपाळ हे “वीर राणा संक” या संप्रदायाचे होते. त्यांच्या वडिलांचे नाव तुकोजी आणि आईचे अंबाबाई होते. असे म्हणतात की, बराच काळ मूलबाळ न झाल्याने तुझ्या अंगाऱ्याच्या आशीर्वादाने जर आम्हाला मूल झाले तर आम्ही त्याला तुझे नाव देऊ आणि आमचे आडनाव अंगारे (जे पुढे आंग्रे झाले) असे ठेवू. त्याप्रमाणे झाल्यामुळे ते कान्होजी आंग्रे म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले. हा किल्ला पुढे त्यांनी काबीज केला. त्यांचे वडीलही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदरी सरदार होते. कान्होजींना लहानपणापासूनच समुद्री सफरींची आणि साहसी मोहिमांची आवड होती.

१६९८ मध्ये कोल्हापूरचे भोसल्यांनी त्यांना दर्यासारंग अशी पदवी देऊन, (संदर्भ - कान्होजी आंग्रे (चरित्र, लेखक पु.ल.देशपांडे) मुंबईपासून विंगोरिया (आताचे वेंगुर्ला) पर्यंतच्या किनारपट्टीची जबाबदारी सोपवली. सिद्दी जोहरच्या ताब्यातला जंजिरा मात्र मुघलांच्या अधिपत्याखाली राहिला. कान्होजींनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यापारी जहाजांवर हल्ला चढवून केली. अनेक प्रयत्नांनंतरही कान्होजींच्या आरमाराचा पराभव करण्यात अपयश आल्याने ब्रिटिशांनी कोकण किनारपट्टीवर त्यांचे वर्चस्व मान्य करत शांततेचा तह केला.

१७०७ मध्ये साताऱ्याचे छत्रपती शाहू (तथ्य तपासा ?) गादीवर येताच, त्याच्या आदेशान्वये त्यांचे सेनापती पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांनी कान्होजींबरोबर करार केला. या करारान्वये त्यांची मराठा आरमार प्रमुख म्हणून नेमणूक झाली. मराठेशाहीच्या गादीवर दावा करणाऱ्या ताराबाईंशी कान्होजीचे सख्य होते. ते मोडून त्यांना आपल्या बाजूला खेचण्यासाठी शाहू महाराजांनी ही राजकीय खेळी केली होती असे म्हणले जाते.

कान्होजींनी औरंगजेबाच्या दख्खन मोहिमेविरुद्ध लढण्यासाठी मराठ्यांना मोलाची मदत केली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →